Ahmednagar News : जामखेड येथील स्मशानभूमीजवळ एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता; परंतु जामखेडच् पोलीसांनी अवघ्या दोन तासांत ओळख पटवली.
अंबादास रामभाऊ काळे (वय ८२), रा. संताजीनगर, जामखेड), असे मयताचे नाव असून, त्याचा मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.
पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, आज बुधवार (दि.२४) रोजी दुपारच्या सुमारास जामखेड येथील स्मशानभूमी शेजारी पुरुष जातीच्या अज्ञात व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती जामखेड पोलीसांना मिळाली.
पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे हे फौजफाट्यासह घटनास्थळी गेले. त्यांनी मृतदेहाची पाहून चौकशी केली चौकशी केली असता, मृतदेहाच्या पायातील एक चप्पल मृतदेहा शेजारी सापडल्याने
सहाय्यक पोलीस निरीक्षक गौतम तायडे, पोना. संतोष कोपनर, पोना. सरोदे, पोलिस उपनिरीक्षक पगारे, पोकॉ. देवा पळशी, पो. हे.कॉ. घोडके, पोकॉ. मांडगे व त्यांच्या टीमने अवघ्या दोन तासांत मृतदेहाची ओळख पटवून मृतदेह मयताचा मुलगा रमेश अंबादास काळे, (रा. संताजीनगर, जामखेड) यांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोना. सरोदे करीत आहेत