अहमदनगर Live24 टीम, 04 ऑक्टोबर 2021 :- गेल्या आठ दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यातील सौताडा येथे ग्रामसेवकाने आत्महत्या केली होती. त्या ग्रामसेवकाचा काल मृतदेह सापडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील ग्रामसेवक झुंबर मुरलीधर गवांडे यांनी २४ सप्टेंबर शुक्रवारी रोजी पाटोदा तालुक्यातील सौताडा धबधब्यावरुन उडी मारून येथील दरीत आत्महत्या केली.
यानंतर पोलिसांनी त्यांचा दरीत मृतदेह शोधण्यासाठी शोधमोहीम सुरु केली, मात्र त्यांच्या मृतदेहाचा शोध लागला नव्हता. दरम्यान दि.२ रोजी तब्बल आठ दिवसानंतर त्यांचा मृतदेह नदीत आढळून आला.
श्रीगोंदा तालुक्यातील मांडवगण येथील रहिवाशी असलेले ग्रामसेवक गवांदे हे मांडवगण जवळच असणाऱ्या खांडगाव येथेच कार्यरत होते.
त्यांनी बीड जिल्ह्य़ातील पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील रामेश्वर धबधब्यावरुन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली होती. यानंतर त्यांचा पोलिस सातत्याने शोध घेत होते
मात्र मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे शोधकार्य करताना अडथळे निर्माण होत होते. शेवटी आठ दिवसानंतर ग्रामसेवक गवांदे यांचा मृतदेह दरीत आढळून आला.