अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील मालुंजे खुर्द येथील चंद्रभान नारायण गुंजाळ (वय ६५) यांचा नदीपात्रात पाय घसरून बुधवारी संध्याकाळी मृत्यू झाला. चार दिवसांनंतर त्यांचा मृतदेह रविवारी सायंकाळी सापडला.
गुंजाळ हे शेजारील गावातील एका शेतकऱ्याचे सायफन खाेदण्यासाठी गेले होते. संध्याकाळी काम उरकून घरी परतताना ते पाय घसरून नदीत पडले.
चार दिवसांनंतर रविवारी मृतदेह मालुंजा शिवारात आढळला. मृतदेह नदीबाहेर काढत शवविच्छेदनासाठी राहुरीला पाठवण्यात आला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved