अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथे घरासमोर लावलेली बोलेरो जीप (क्र.एमएच ४२एच ६६०२) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली. दरम्यान अनिल माधव साळवे रा.राशीन यांच्या घरासमोर हि घटना घडली आहे.
या प्रकरणी विजय लक्ष्मण रणदिवे (रा.रूई घाडगेवस्ती ता.बारामती जि.पुणे) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात गुन्ह दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रणदिवे यांनी राशीन येथे अनिल माधव साळवे यांच्या घरासमोर लावलेली बोलेरो जीप (क्र.एमएच ४२ एच ६६०२) ही अज्ञात चोरट्याने चोरून नेली.
ही घटना दि.२३ ते २४ जानेवारी रोजीच्या दरम्यान घडली. याबाबत रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कर्जत पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून, याबाबत अधिक तपास पोहेकॉ.एमजी काळे हे करत आहेत.