अहमदनगर बातम्या

वडिलांबरोबर मुलगा शेतात गेला आणि त्याच्यावर काळाने घाला घातला

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 02 ऑक्टोबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका शिवारात वीज पडून एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडला आहे. हर्षद गणेश काळे (वय ११) असे मयत मुलाचे नाव आहे.

दरम्यान या दुर्दैवी घटनेमुळे तालुक्यात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील दहेगाव बोलका परिसरात वाटर सप्लाय जवळ हर्षद गणेश काळे (वय ११)

वर्ष हा आपल्या वडिलांबरोबर शेतात गेला असता दुपारी अचानक पाऊस सुरू झाला यावेळी हर्षद हा शेताच्या बांधावर उभा असताना अचानक अंगावर वीज अंगावर पडून त्याचा मृत्यू झाला आहे.

त्यास तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र येथे हलवण्यात आले. मात्र त्यांनी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात हलवण्यास सांगितल्यामुळे त्याला ग्रामीण रुग्णालयात आणले असता

त्याला डॉक्टरांनी तपासले व तो मृत असल्याचे सांगितले या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

Ahmednagarlive24 Office