अहमदनगर Live24 टीम,21 सप्टेंबर 2020 :- अनेकदा छोटं छोट्या कारणावरून वाद होतात, व वाद विकोपाला गेला कि त्याचे रूपांतर मारहाणीत होते. अशीच एका घटना जिल्ह्यातील अकोले तालुक्यात घडली आहे.
अकोले तालुक्यातील गणोरे येथे एक महिला ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेली असता हा ओढा आमचा आहे. असे म्हणत तिचे धुणेच ओढ्यात फेकुण देत संबंधित महिलेच्या मुलास गजाने मारहाण करीत गंभीररित्या जखमी केले.
याप्रकरणी पंकज कैलास भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नवनाथ गोविंद आहेर, स्वाती नवनाथ आहेर, गोविंद शंकर आहेर व चंद्रभागा गोविंद आहेर (सर्व. रा. गणोरे, ता. अकोले) यांनी आरोपी करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पंकज भालेराव यांच्या मातोश्री बुधवारी त्यांच्या जवळच्या ओढ्यावर धुणे धुण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी नवनाथ आहेर हा तेथे आला व त्याने संबंधित महिलेस दमदाटी सुरू केली.
हा ओढा आमच्या मालकीचा आहे. तुम्ही या ओढ्यावर यायचे नाही. असे म्हणत शिवीगाळ केली व त्या महिलेची बकेट ओढ्याच्या प्रवाहात फेकून दिली.
त्यानंतर आरोपी नवनाथ आहेर याने संबंधित महिलेला ढकलून दिले व नवनाथ सोबतच्या इतरांनी पंकज यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तर आरोपींनी त्याला लोखंडी गजाने मारहाण करीत गंभीर जखमी केले आहे.= पंकज भालेराव यांच्या उजव्या पायाला लोखंडी गजाने मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत.
दरम्यान त्यांना उपचारासाठी संगमनेर येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पंकज यांच्या जबाबावरून अकोले पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास गोराणे करीत आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved