Ahmednagar Breaking : पंढरपूरहून नाशिककडे जाणाऱ्या बसचे ब्रेक झाले फेल ! गाडी प्रवरा नदीकडे जाण्याची शक्यता पण चालकाच्या…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : कोल्हार खुर्द येथे पंढरपूरहून नाशिककडे जाणाऱ्या बसचे ब्रेक फेल झाल्याने मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस एक बांधकाम चालू असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यावर घातल्याने प्रवाशांचे प्राण वाचले. रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

पंढरपूरहुन नाशिकच्या दिशेने जात असलेली महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस (क्रमांक एमएच ४० एक्यू ६३७३ ही प्रवाशांना घेऊन जात होती. यादरम्यान नगर मनमाड महामार्गावर कोल्हार खुर्दजवळ या बसचे ब्रेक फेल झाले. ब्रेक फेल झाल्याचे पंढरपूर डेपोचे चालक महादेव पांढरे लक्षात आले.

यादरम्यान अर्धा ते एक किलोमिटरपर्यंत त्यांनी बसला थांबविण्यासाठी सुरक्षित जागा शोधली. पुढे येताच त्यांना कोल्हार खुर्दजवळ बिरोब मंदिराजवळ बांधकामाच्या ठिकाणी एक वाळुचा ढिगारा दिसला.

त्यांनी तातडीने बस या ढिगाऱ्यावर घातली. या वाळुच्या ढिगाऱ्यावर जाऊन बस पुढे असलेल्या बांधकामावर धडकली व गाडी थांबली. वाळुच्या ढिगाऱ्यामुळे या बसचा वेग बऱ्यापैकी कमी झाला होता. त्यामुळे बस सुरक्षित थांबली.

रविवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या बसमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. धडक बसल्यानंतर प्रवासी घाबरलेले होते. यामध्ये प्रवाशांना कोणतीही इजा झाली नाही, फक्त एक महिला किरकोळ जखमी झाली.

चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला. कारण काही सेकंदावरच पुढे प्रवरा नदीचा पूल होता. चालकाने प्रसंगावधान दाखवले नसते, तर गाडी प्रवरा नदीकडे जाण्याची शक्यता होती. त्यामुळे चालकाच्या या हुशारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.