अहमदनगर बातम्या

एसटी बसचा ब्रेक फेल झाला आणि चालकाच्या प्रसंगावधानाने २० प्रवाशांचा जीव वाचला

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शेवगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच इ७, सीएच ९२४७) ही पैठण येथून शेवगावच्या दिशेने येत असताना बस शेवगाव पोलिस ठाण्याजवळ येताच अचानक पाईप फुटल्याने तिचा ब्रेक फेल झाला.

मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने बसमधील २० प्रवाशांचे प्राण वाचवले. ही घटना शनिवार, दि.२८ ऑक्टोबर रोजी सकाळी दहाच्या सुमारास घडली.

याबाबतची माहिती अशी की, शेवगाव आगाराची एसटी बस (क्र. एमएच ३७, सीएच ९२४७) ही पैठण येथून शेवगावच्या दिशेने येत असताना बस शेवगाव पोलिस ठाण्याजवळ येताच अचानक पाईप फुटल्याने तिचा ब्रेक फेल झाला.

या वेळी चालक महादेव बुधवंत यांनी वेळीच खबरदारी घेत बस आगारात घातली. मात्र, ब्रेक फेल झाल्याचे समजताच शेवगाव आगारात असलेल्या प्रवशांसह कर्मचाऱ्यांची एकच धांदल उडाली.

मात्र, चालक महादेव बुधवंत यांनी मोठ्या हुशारीने छोट्या टेकडीवर बस घालून ती थांबवत प्रवाशांचे प्राण वाचवले. या बसमध्ये चालक, वाहकांसह २० प्रवाशी होते. बसमधून खाली उतरल्यानंतर प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office