Breaking News : संगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीवरील पुलाला भगदाड !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Breaking News : संगमनेर तालुक्यातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि दोन गावांना जोडणाऱ्या जोर्वे ते पिंपरणे या प्रवरा नदीवरील पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे एखादी दुर्घटना घडण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना करणे गरजेचे आहे.

जोर्वे ते पिंपरणे या दोन गावांच्या मधून प्रवरा नदी वाहत आहे. याच नदीवर हा पुल आहे. या पुलावरून कनोली, ओझर, शेडगाव आदी गावांमधील नागरिकांसह लहान-मोठ्या वाहनांचीही नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने हा पुल अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे.

गेल्या वर्षी याच पुलाचे संरक्षक कठडे तोडून मालवाहू गाडी खाली कोसळली होती. त्यामध्ये दोघा जणांना आपले जीवही गमवावे लागले होते. असे असतानाही अद्यापही तुटलेल्या संरक्षक कठडेच्या जागी दुसरे कठडे बसविण्यात आले नाही. त्यातच आता पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे.

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला माहिती समजताच त्यांनी शनिवार (दि. २९) जुलै रोजी सकाळी घटनास्थळी येवून पाहणी केली. त्यानंतर जेसीबीच्या माध्यमातून पुलाच्या पायाजवळ वाळूचा भरावा केला आहे. त्यानंतर पडलेल्या खड्ड्यात तात्पुरत्या स्वरूपात विटांचा भराव केला आहे.

दरम्यान, प्रवरा नदीला पाणी आल्यानंतर पायाजवळ केलेला भरावा वाहून जाणार आहे. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्या अगोदर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ याठिकाणी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे.

जोर्वे-पिंपरणे या दोन गावांना जोडणाऱ्या प्रवरा नदीवरील पुलाचे काम काही वर्षांपूर्वी झाले आहे. त्यामुळे पुलावरून दहा ते बारा गावांमधील नागरिकांसह लहान-मोठ्या वाहनांची नेहमीच मोठी वर्दळ सुरू असते.

त्याच बरोबर दळणवळणाच्या दृष्टीने हा पुल अत्यंत महत्त्वाचा म्हणून ओळखला जात आहे. मात्र पुलाच्या कडेला मोठे भगदाड पडले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांसह वाहन चालकांनी केली आहे.