तुटलेली वीजवाहिनी शेतात पडली; 25 एकर ऊस जाळून खाक

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 28 डिसेंबर 2020 :-कोरोना महामारीशी लढणाऱ्या बळीराजाला अनेक संकटाचा सामना करावा लागतो आहे. कोरोना नंतर अतिवृष्टी आता मानवनिर्मित संकटामुळे बळीराजा आर्थिक संकटात सापडला आहे.

नुकतेच पाथर्डी तालुक्यात शेतकऱ्याच्या शेतात मुख्य वीज वाहिनी तुटून सुमारे 25 एकर शेतातील तोडणीस आलेला ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान हि घटना रविवार (दि.27) रोजी घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, वीज वितरण कंपनीची मुख्य 132 केव्ही होल्ड असलेली टॉवर लाईन वरील तार अचानक तुटून शेतात पडली व ठिणग्या निघून आग निर्माण झाली.

आग बघताच परिसरातील ग्रामस्थानी घटनास्थळी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. तार तुटली यामुळे संबंधित ठिकाणावरील अनेक ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा 25 एकर ऊसाचे क्षेत्र जाळून खाक झाले आहे.

एकरी 60 ते 70 टन ऊसाचे उत्पादन यातून मिळते. येत्या आठ दिवसानंतर हे सर्व ऊसाचे क्षेत्र तोडणीसाठी आले असतांना अशी घटना घडल्यामुळे शेतकर्‍याला मोठा आर्थिक भुर्दंड बसणार आहे.

या संबधित शेतकर्‍यांना त्वरित नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24