अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- महायुती सरकारच्या काळातील जलयुक्त शिवार योजनेचे चांगलेच भांडवल करण्यात आले होते. या योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कसा फायदा झाला याचे महत्व पटवून देण्यात आले होते.
याच जलयुक्त शिवार योजनेसंबंधी कॅगचा अहवाल आला आहे. आणि ही योजना असफल ठरल्याचे त्यातील शेऱ्यांवरून दिसून येत आहे. यावरून कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर निशाणा साधला असून या योजनेच्या चौकशीची मागणी केली आहे.
युती सरकारमध्ये हे खाते भाजप नेते, माजी मंत्री राम शिंदे यांच्याकडे होते. त्यामुळे पवार यांनी या योजनेच्या चौकशीची मागणी करून शिंदे यांना अडचणीत आणले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सत्ता असताना ग्रामीण भागातील भूजल पातळी वाढविण्यासाठी जलयुक्त शिवार ही महत्वाकांशी योजना राबविण्यात आली.
यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी संकलित आणि खर्चही करण्यात आला होता. नंतरच्या काळात या योजनेबद्दल तक्रारीही येऊ लागल्या. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली. दरम्यान योजनेच्या काळातील कॅगचा अहवाल प्राप्त झाला आहे.
त्यामध्ये ही योजना अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. हा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला. त्यानंतर यावर चर्चा सुरू झाली आहे. योजनेची चौकशी करा; रोहित पवारांची मागणी यासंबंधी रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. ‘ग्रामीण भागासाठी क्रांतिकारी योजना असल्याचा मागील भाजप सरकारने गाजावाजा केलेल्या
जलयुक्त शिवार योजनेचा फुगा कॅगच्या अहवालाने फुटला. तब्बल साडेनऊ हजार कोटी रुपये खर्चूनही भूजलपातळीत वाढ झाली नसेल तर हे पैसे गेले कुठे? याचा तपास झाला पाहिजे, अशी मागणी रोहित यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
*कॅगच्या अहवालातील ठळक मुद्दे*.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved