या तालुक्याचा बैलबाजार शनिवार पासून होणार सुरू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,16 ऑक्टोबर 2020 :- कोरोनामुळे अनेक गोष्टींना बंदी घालण्यात आली होती. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. आता याच अनुषंगाने सरकारकडून लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात येत आहे,

यातच जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील आठवडी बाजार व बैलबाजार शनिवार पासून खुला करण्यात येणार आहे. याबाबतची माहिती जामखेड नगर परिषदेचे मुख्याधिकारी मीनानाथ दंडवते यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

जामखेड येथील जनावरांचा बाजार बैलांसाठी प्रसिद्ध आहे. उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यातील पशुधन विक्रेते आपले पशुधन या बाजारात विक्रीसाठी आणतात. लॉकडाऊनमुळे गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रसिद्ध बाजार बंद ठेवण्यात आला होता.

मात्र आता मिशन बिगुल अंतर्गत राज्य शासनाने टाळेबंदी उठविल्या मुळे जिल्हाधिकारी यांनी आठवडी बाजारासाठी परवानगी दिल्यानंतर शनिवारी बाजार भरत आहे .

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बैलबाजार भरणार असल्याचे प्रसिध्दी पत्रकाद्वारे सांगण्यात आले आहे. दरम्यान यावेळेत शासनाने ठरवून दिलेले सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे, अशी माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24