पोलिस असल्याचे सांगत व्यापाऱ्यास लुटले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,21 जून 2020 :   आम्ही पोलिस असे सांगत नगर शहरात भरदिवसा दोघा चोरट्यांनी उद्योजकाला मारहाण करत त्याच्याकडील 1 लाख 20 हजार 200 रुपये हिसकावले.

शनिवारी दुपारी शहरातील गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत ही घटना घडली. याप्रकरणी अमित ज्ञानेश्वर सुंकी यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सुंकी यांची नगर एमआयडीसी येथे कंपनी आहे. ते शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मोटरसायकलवरून गंगा उद्यान परिसरातून जात होते.

याचवेळी युनिकॉर्न या मोटरसायकलवरून दोन जण आले. त्यांच्या मोटारसायकलला फायबरचे दांडके लावलेले होते. त्यांनी सुंकी यांची गाडी थांबविली व आम्ही पोलिस असल्याचे सांगितले. त्यानंतर सुंकी यांना त्यांची मोटरसायकल गंगाउद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेत घेण्यास सांगितली.

मैदानात गेल्यानंतर या दोघांनी सुंकी यांना मारहाण त्यांच्या खिशातील पैसे हिसकावून नेले. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सोळंके हे करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24