अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2022 :- औरंगाबाद येथून अहमदनगर शहरात आलेल्या व्यावसायिकाची कार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. त्यातील रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख 10 हजार रूपयांचा मुद्देमाल काढून घेतला आणि कार चाँदबिबी महालाजवळ सोडून दिली.
याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील व्यावसायिक रिकेश पटेल (वय 38) हे त्यांची कार घेऊन अहमदनगर येथील ख्रिस्तगल्ली आले होते.
त्यांनी त्यांची कार तेथे उभी केली होती. तेथून सायंकाळी साडेचार ते सात वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी त्यांची कार चोरून अहमदनगर – पाथर्डी रस्त्यावरील चाँदबीबी महालाजवळ घेऊन गेले.
या कारमधील रोख रक्कम व दोन मोबाईल असा एक लाख 10 हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरला. पटेल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.