अहमदनगर बातम्या

चोरटयांनी पळविलेली रोकड पोलिसांनी अवघ्या काही तासातच केली हस्तगत

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :-  जिल्ह्यात चोरी, लुटमारीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज रस्ते देखील प्रवासासाठी आज सुरक्षित राहिले नाही आहे. अशा घटांनमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

यातच नगर शहरातील गजबजलेल्या भागातून काही दिवसांपूर्वी अ‍ॅड. अशोक गांधी यांचे तीन लाख रुपये चोरट्यांनी चोरले होते. दरम्यान चोरीच्या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

विशेष बाब म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये पोलिसांनी आपली सक्षम यंत्रणा कार्यरत करत चोरट्यांना मुद्देमालासह जेरबंद केले.

चोरीच्या घटनेनंतर अ‍ॅड. गांधी यांनी पोलिसांमध्ये फिर्याद दिल्यानंतर पोलीस अधीक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व कोतवाली पोलिसांच्या पथकाने काही तासांत चोरट्यांना रकमेसह जेरबंद केले.

कर्तव्यदक्ष पोलीस विभाग व अधिकारी, कर्मचारी यांनी प्रामाणिकपणे व तत्परतेने केलेल्या प्रयत्नांमुळे चोरी गेलेली अ‍ॅड. गांधी यांची रक्कम परत मिळाली.

या कर्तव्यदक्षतेला कृतज्ञतेचा सलाम म्हणून 21 हजार रुपयांच्या मदतीचा धनादेश पोलीस कल्याण निधीस अ‍ॅड. गांधी यांनी दिला आहे.

Ahmednagarlive24 Office