मुख्यमंत्र्यांना त्यांनी शेतकऱ्यांना दिलेल्या ‘त्या’ घोषणेचा विसर पडला

अहमदनगर Live24 टीम, 18 जानेवारी 2022 :-  राज्य सरकार सर्वच आघाड्यावर अपयशी ठरले असून, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचवीस हजार रुपये अनुदान देण्याच्या घोषणेचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला आहे.

मुख्यमंत्री फक्त मुंबईचाच विचार करून पॅकेज देतात.एस.टी.कर्मचाऱ्यांचा संप, वीजबील वसुलीसाठी जुलमी पध्दतीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीज पुरवठा खंडीत करणे,

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

नोकरभरती व स्पर्धा परीक्षेतील गोंधळ, फसवी कर्जमाफी, भष्टाचार असे सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

सरकारकडून केवळ विरोधकांची मुस्कटदाबी केली जात असून त्यांना बोलण्याची संधी दिली जात नाही. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांनी राज्य सरकारला सामान्य जनतेच्या प्रश्नावर सळो की पळो करून सोडले असुन सरकार ऐवजी विरोधी पक्षच शेतकऱ्यांसह सामान्य जनतेला न्याय देण्याचे काम करत आहेत.

सरकारच्या निष्क्रीयतेबाबत जनतेने जाब विचारला पाहिजे असे मत आमदार मोनिका राजळे यांनी व्यक्त केले. तालुक्यात आयोजित एका त्या बोलत होत्या.

यावेळी पुढे बोलतांना आ.राजळे म्हणाल्या अतिवृष्टीचे साडेअकरा कोटी अनुदानापैकी साडेसहा कोटी अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले असुन उर्वरित अनुदान मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा चालु आहे.

अनुदान प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाईल. राज्य शासनाची कर्जमाफी योजना फसवी असुन यात अनेक पात्र शेतकरी वंचित राहिले आहेत.

याबाबत बँकेच्या संचालक मंडळ बैठकीत यावर चर्चा होऊन सरकारकडे पाठपुरावा चालु आहे.सरकारने नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना घोषणा करूनही अद्यापही अनुदान दिले नाही त्यासाठीही सरकारला धारेवर धरू असेही आ.राजळे यावेळी म्हणाल्या.