अहमदनगर Live24 टीम,26 सप्टेंबर 2020 :- राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, याच अनुषंगाने गावपातळीवर ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हि मोहीम शासनाने हाती घेतली आहे.
दरम्यान नगर जिल्ह्यात या मोहिमेची उत्कृष्ट कामगिरी पाहून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले आहे. कोरोनाचे वाढते संक्रमण रोखण्यासाठी प्रत्येक कुटुंबाने आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्याने या मोहिमेत सहभाग नोंदवावा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्वेक्षण मोठ्या प्रमाणात गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री ठाकरे हे राज्यातील सर्व महसूल विभागनिहाय प्रत्येक जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेच्या अंमलबजावणीचा आढावा घेत आहेत.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी आज नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री व अधिकार्यांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर येथून तर अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,
मनपा आयुक्त श्रीकांत मायकलवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अप्पर पोलिस अधीक्षक सागर पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे,
जिल्हा साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंखे आदी उपस्थित होते. सुरुवातीलाच ठाकरे यांनी पालकमंत्री मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्याकडून जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव, त्यासाठी केलेल्या उपाययोजना आदींची माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी सांगितले की,
माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेसाठी जिल्ह्यात सतराशे पथकांच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यात येत आहे. जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवली आहे, त्यामुळे नवे रुग्ण वाढत असले तरी बरे होऊन घरी जाणार्या रुग्णाचे प्रमाण हे 87 टक्क्यांहून अधिक आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved