अहमदनगर Live24 टीम,26 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यातील उत्तरेकडे बिबट्याची दहशत कायम असताना एका नव्या प्राण्यांमुळे सध्या संगमनेर तालुक्यातील नागरिक भयभीत झाले आहे.
तसेच या प्राण्याने आजवर अनेकांवर हल्ला करत नागरिकांना जखमी केले आहे. यामुळे या प्राण्याची दहशत सध्या परिसरातील नागरिकांच्या मनात घर करून बसली आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील हंगेवाडी, शेडगाव, शिबलापूर व माळेवाडी परिसरात तरस सदृष्य प्राण्याने धुमाकूळ घालत हंगेवाडी व शेडगाव परिसरातील माजी पंचायत समिती
सभापतीसह तब्बल आठ ते दहा जणाना चावा घेत गंभीर जखमी केल्याने परिसरात दहशत निर्माण झाली आहे. या सर्व जखमीना तातडीने संगमनेर येथिल सरकारी रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असल्याची
माहिती पंचायत समिती सदंस्य निवृत्ती सांगळे यांनी दिली आहे. तर पानोडी येथिल प्रियंका कराड व शिबलापूर येथिल बबन मुन्तोडे या दोघांवर ही या प्राण्याने हल्ला केल्याची माहिती मिळाली.
दरम्यान तरस सदृष्य प्राण्याने धुमाकूळ घातल्यामुळे मोठी दहशत निर्माण झाली असून नागरीकानी खबरदारी घेऊन योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन सांगळे यांनी केले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved