शहराला विकासात्मक व्हिजन असलेला युवा आमदार मिळाला -प्रा. माणिक विधाते

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,31ऑक्टोबर 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध विभागातील पदाधिकार्‍यांची नियुक्ती करुन त्यांना आमदार अरुणकाका जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आलले.

राष्ट्रवादी वक्ता सेलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी नितीन लिगडे, सेवा दलच्या शहर जिल्हाध्यक्षपदी प्रताप सौदे, कार्याध्यक्षपदी शाहिद शेख, राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी निलेश इंगळे, सरचिटणीसपदी गणेश बोरुडे यांची नियुक्ती करण्यात आली.

पदाधिकारी नियुक्ती कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, हमाल पंचायतचे अध्यक्ष अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, विपुल शेटीया, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत खोसे, ओबीसी सेलचे अमित खामकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे गजानन भांडवलकर,

फुले ब्रिगेड अध्यक्ष दीपक खेडकर, शहर संघटक राजेश भालेराव, माथाडी कामगार शहराध्यक्ष ऋषी ताठे, अ‍ॅड. गजेंद्र दांगट, वैभव म्हस्के, फारुक रंगरेज, सुमित कुलकर्णी, रोहन शिरसाठ, आकाश आवटी, क्षितिज वांद्रे, रुपेश चोपडा, संजय सत्रे, यश लिगडे आदींसह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रा. माणिक विधाते म्हणाले की, शहराच्या विकासासाठी संग्राम जगताप यांच्या रुपाने विकासात्मक व्हिजन असलेला युवा आमदार मिळाला आहे. शहरात विकासात्मक बदल घडत असताना मोठ्या प्रमाणात युवा वर्ग त्यांच्याशी जोडला जात आहे. तर युवकांना राष्ट्रवादीत काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.

सर्वसामान्य व्यक्ती केंद्र बिंदू मानून राष्ट्रवादी राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्त्व देऊन कार्य करीत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांनी नुतन पदाधिकार्‍यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्य करणार असून, पक्षाची ध्येय धोरण सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचविण्याचे कार्य केले जाणार आहे. तर सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्‍न, अडी-अडचणी दूर करण्यासाठी कटिबध्द राहणार असल्याचा मानस नूतन पदाधिकार्‍यांनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24