‘त्या’मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 ऑक्टोबर 2020 :-निमगाव खुर्द येथील विवाहितेच्या आत्महत्येवरून सासर व माहेरच्या लोकांत तणावाचे वातावरण आहे. या घटनेत प्राचार्य अशोक अप्पासाहेब गुंजाळ यांनी हस्तक्षेप केल्याचा आरोप करत माहेरच्या महिलांनी त्यांना, त्यांची पत्नी व मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

ही घटना सोमवारी सकाळी ९ वाजता विवाहितेच्या दहाव्याच्या प्रसंगी घडली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते. ट्रॅक्टर घेण्यासाठी माहेरून ४ लाख रुपये आणावेत, यासाठी पूनम अमोल कासार (वय २३) हिचा सासरी छळ सुरु होता. जाचास कंटाळून तिने १० अाॅक्टोबरला घरात गळफास घेत आत्महत्या केली.

या संदर्भात सासरच्या तिघांवर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पती अमोल व सासरा आबासाहेब अटकेत आहेत. या प्रकरणात अमोलचे मामा प्राचार्य गुंजाळ यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माहेरच्या लोकांनी संयम ठेवला होता. सोमवारी पुन्हा दशक्रिया विधीच्या वेळी हा वाद उफाळला.

विधीला आलेल्या माहेरच्या महिलांनी प्राचार्य गुंजाळ व त्यांना सोडवण्यास आलेली त्यांची पत्नी व मुलीलाही बेदम मारहाण केली. काही नागरिकांनी गुंजाळ दाम्पत्याला तेथून बाहेर काढले. रात्री उशिरापर्यंत तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. मारहाणीची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24