नगर जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-नगर शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. घरे गारठली आहेत, तर नदी-नाल्याकाठच्या परिसरात थंडीचा कडाका तीव्रतेने जाणवत आहे.

गुलाबी थंडीचा अनुभव घेतल्यानंतर जिल्ह्याच्या तापमानात घट होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्ह्यात गत आठवड्यापासून थंडीचा जोर वाढताना दिसत आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात तापमानाची घट पाहायला मिळत आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीचा कडाका वाढला आहे. अहमदनगरसह पुणे, नाशिक, जळगाव, गोंदिया, नागपूर आणि इतर अनेक जिल्ह्यात किमान सरासरी तापमानात कमालीची घट झाल्याचे दिसते आहे.

तापमानाचा पारा 10 अंशावर घसरल्याने पहाटे हवेत गारवा जाणवू लागला आहे. थंडीची चाहूल लागल्यामुळे शहरातील जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी व व्यायाम करण्यासाठी सकाळी व सायंकाळी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरिक स्वेटर, मफलर, कानटोप्या त्याशिवाय शेकोट्यांचा आधार घेत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24