अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- येथील कवी विनोद शिंदे यांचा संवेदना प्रकाशन संस्था, पुणे यांच्या वतीने माजी संमेलनाध्यक्षा डॉ.अरुणाताई ढेरे यांचे हस्ते व गझलकार रमण रणदिवे यांचे प्रमुख उपस्थितीत शेते कापणीसाठी पांढरी झाली आहेत या कविता संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले.
राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या कविता संग्रह मंत्रीमंडळात जाण्यासाठी कवी शिंदे यांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेऊन त्यांना या कविता संग्रहाची भेट दिली.
यावेळी जॉय लोखंडे, माजी नगरसेवक निखिल वारे, अशोक मोरे आदी उपस्थित होते. या कवितासंग्रहात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी विधानसभेच्या निवडणुकीत झंझावाती प्रचारसभा घेतल्या.
प्रतिकूल परिस्थितीतही सातार्यात धो-धो कोसळणार्या पावसात ऐतिहासिक सभा गाजवून निवडणुकीची दिशा बदलवून विजय खेचून आनला. महाविकास आघाडीचे तीन पक्षांची बांधणी करून भुतो न भविष्यती असे सरकार स्थापन केले. सर्वसामान्य लोकांना त्यांचे हे कष्ट भावले. त्यांच्या संवेदना जागृत झाल्या.
या सभेचे वृत्तपत्रांनी केलेले लाईव्ह प्रक्षेपण पाहून या घटनेवर कवी विनोद शिंदे यांनी ते लढताहेत लढतच राहणार अविश्रांतपणे ही कविता लिहून ती उपरोक्त संग्रहात छापली. राष्ट्रवादीचे आमदार व महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधी म्हणून संग्राम जगताप यांना या संग्रहाची ही प्रत देण्यात आली.
तसेच करोनाच्या या जीवघेण्या परिस्थितीतही मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी व त्यांच्या मंत्री मंडळाने ज्या संयमाने व धीराने ही परिस्थिती हाताळली त्यासाठी अग्रदूत या नावाची मुख्यमंत्री यांच्यावर कविता लिहून तिचा समावेशही वरील पुस्तकात करण्यात आला आहे.
आमदार संग्राम जगताप यांनी या कविता संग्राहाचे कौतुक करुन, राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व मंत्रिमंडळाची दखल एक सर्वसामान्य अहमदनगरचा कवी घेतो, ही आमच्या कामाची पावतीच आहे. अहमदनगर जिल्ह्याला मोठी साहित्याची परंपरा लाभली आहे. ती परंपरा कवी व लेखक विनोद शिंदे हे समर्थपणे पुढे घेऊन जात आहे.
कवी सृजनशील व्यक्तीमत्व असून, समाजातील घटनांवर आपल्या कवीतेतून भाष्य करीत असतात. हा कवीता संग्रहाचा अमुल्य ठेवा शरद पवार यांना भेटून प्रत्यक्ष देणार असल्याचे त्यांनी सांगितले.