अहमदनगर Live24 टीम, 14 जानेवारी 2021 :-कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी गेले असता पक्ष आणि त्याच्या बद्दल अपशब्दचा वापर करून अपमानास्पद वागणूक दिल्याबद्दल
त्यांनी पोलीस निरीक्षक मानगावकर यांच्या बद्दल प्रतिक अरविंद बारसे जिल्हाध्यक्षक वंचित बहुजन आघाडी यांनी पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे निवदेनाद्वारे तक्रार केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि १२ जानेवारी रोजी सायंकाळी ७.३० वाजेचे दरम्यान मी व माझे सोबत माझ्या पक्षाचे कार्यकर्त्यासोबत पत्रकार प्रशांत पाटोळे यांना झालेल्या मारहाणी संदर्भात कोतवाली पोलीस स्टेशनला गेलो होतो.
त्यावेळी वादग्रस्त पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी तुम्ही ईथे का आलात असे विचारत तुझ्यावर किती गुन्हे दाखल आहेत, तु पोलीस स्टेशनला का आला असे विचारुन अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
तसेच पुन्हा जर पोलीस स्टेशनमध्ये दिसला तर तुला तोडुन टाकीन असे म्हणाले , तसेच पक्षाबद्दल अपमानास्पद शब्द प्रयोग केला. व जाणीवपूर्वक समाजामध्ये जातीयवादेचा तिडा निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
असे वक्तव्य एका जबाबदार पोलीस निरीक्षक या पदावर असणारे यास अशोभनिय आहे व समाजासाठी घातक देखील आहे. त्यांच्याकडुन अशा वागणुकीमुळे व घृणास्पद संभाषनामुळे समाजामध्ये जातीयवादाला वाव मिळेल.
याबाबत आपण सि.सी.टि.व्ही.फुटेज बघुन शहानिशा करुन पोलीस निरीक्षक मानगावकर यांचेवर योग्य ती कायदेशीर कारवाई करुन त्यांना तात्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी त्यांनी पोलिसअधीक्षक यांच्या कडे केली आहे.