अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- राहुरी तालुक्यात वाळु चोरी विरोधी पथकांनी प्रवारा व मुळा नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजांचे उत्खनन करुन वाहतुक करीत असतांना जप्त केलेल्या वाहनमालकांविरुध्द दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत.
या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीतील आदेशातील रक्कम शासन जमा केलेली नाही. यामुळे अशा प्रकारची वाहने लिलावाव्दारे विक्री करुन दंडात्मक कार्यवाहीतील रक्कम वसुल करणेकामी दिनांक 21 जानेवारी, 2021 रोजी सकाळी 11 वाजता तहसिल कार्यालय राहुरी येथे जप्त केलेल्या 9 वाहनांचे लिलाव करण्यात येणार आहेत.
तरी, जास्तीत जास्त इच्छुक व्यक्ती, संस्थांनी लिलावात भाग घ्यावा. लिलावातील अटी व शर्ती, लिलावात असलेली वाहनेस लिलावात हातची किंमत आदी बाबत कार्यालयीन वेळेत तहसीलदार, राहुरी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.