अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :-या तिघाडी सरकारमध्ये काँग्रेस पक्षाचे काही चालत नाही. त्यांना कुठलाही निर्णय प्रक्रियेत घेतले जात नाही. खुद्द मा. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर कार्यक्रमात जनतेला सांगितले आहे. काँग्रेस पक्षाचे आमदार फुटतील या भीतीने ते सत्तेमध्ये आहेत.
काँग्रेस पक्षाची व्यथा खूप वाईट असून काँग्रेसला तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करावा लागत आहे. अशी टीका माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांनी केली. नगर तालुक्यातील टाकळी काझी येथे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्यांना खेळते भांडवलाचे चेक वाटप करताना ते बोलत होते.
ते म्हणाले की, लॉकडाऊनच्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांना मदत करण्याचे काम केले. शेतकर्यांना त्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये दिले. तसेच केंद्र सरकारच्या माध्यमातून हातावर काम करणार्यांना मोफत गहू व तांदूळ देण्याचे काम केले. दुष्काळामध्ये शेतकर्यांचे १ लाख पशुधन वाचविण्यासाठी छावण्या सुरु केल्या.
नगर तालुका दुष्काळी व जिराईत तालुका आहे. या तालुक्याचा कायमचा पाणीप्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करुन घोसपुरी व बुर्हाणनगर पाणी योजना मार्गी लावून सुमारे ८० गावांचा पाणीप्रश्न मार्गी लावला. संकटाच्या काळामध्ये नेहमीच नगरपालिकेला न्याय देण्याचे काम केले.
अतिवृष्टीमुळे शेतकर्यांची रब्बी व खरिपाची पिके वाया गेल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यांना मदत करण्यासाठी जिल्हा बँकेच्या माध्यमातून खेळते भांडवल उपलब्ध करुन दिले. टाकळी काझी परिसरातील शेतकर्यांना सुमारे 9 कोटी रुपयांची मदत मिळवून देण्याचे काम केले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved