अहमदनगर- अ.ए.सो. च्या अशोकभाऊ फिरोदिया इंग्लिश मिडीयम स्कूल अॅण्ड ज्यूनिअर कॉलेज मध्ये प्रजातसत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांना एकात्मतेची शपथ देऊन संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले.
प्रारंभी शाळेचे प्राचार्य प्रभाकर भाबड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बॅण्ड पथकाच्या निनादात विद्यार्थ्यांनी संचलन करुन मानवंदना दिली.
वंदे मातरम… भारत माता की जय… या घोषणांनी शाळेचा परिसर दुमदुमून गेला. गणेश कांडेकर यांनी विद्यार्थ्यांना एकात्मतेची शपथ दिली. विद्यालयाचे माध्यमिक विभाग प्रमुख वैशाली वाघ यांनी भारतीय राज्यघटनेची माहिती देऊन प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व विशद केले.