अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नेवासा पोलीस ठाण्याचे कर्मचारी संभाजी गर्जे आणि तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांच्या वाद्ग्रस्त संभाषणाची ऑडिओ क्लीप सोशल मिडियावर व्हायरल झाली होती.
या वाद्ग्रस्त संभाषणाची सत्यता पडताळणीसाठी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दत्ताराम राठोड यांना स्वत: च्या आवाजाचा नमुना देण्याचा आदेश जिल्हा न्यायालयाने दिले होते.
या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. त्यावर सोमवारी सुनावणी घेण्यात आली असून न्यायालयाने स्थगिती कायम ठेवत पुढील सुनावणी 15 जानेवारीला ठेवली असल्याची माहिती अॅड. नितीन गवारे यांनी दिली.
दरम्यान याप्रकरणाच्या चौकशीत डॉ. राठोड यांना आवाजाचे नमुने देण्याचे आदेश जिल्हा न्यायालयाने दिला होता. या आदेशाला डॉ. राठोड यांनी अॅड. नितीन गवारे यांच्यामार्फत औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले होते.