अहमदनगर Live24 टीम, 31 जानेवारी 2022 :- कोरोना काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरु केलेल्या उपाययोजनामुळेच देश आज प्रगतीपथावर आहे.
संकटात जनतेच्या पाठीशी खंबरीपणे उभे राहुन त्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देतानाच, केंद्र शासनाच्या विविध योजनांमधुन सामान्य माणूस सक्षम करण्याचे काम माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवरा परिवाराने आजपर्यंत केल्याचे, प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
खासदार विखेपुढे म्हणाले की, कोण कोणाबरोबर आहे हे मला गरजेचे नाही. देशात केंद्र सरकार सामान्य जनतेला केंद्रबिंदू माणुन काम करीत आहे. विविध शासकीय योजनांच्या अंमलबजावणी मध्ये शिर्डी विधानसभा मतदार संघ आघाडीवर आहे.
वयोश्री योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यात काम आदर्श झाले आहे. माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रयत्नांतून मतदारसंघात ९८ टक्के कोरोना लसीकरण पुर्ण झाले असून,
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या धाडसी निर्णयाने देशात लसीकरणाची मोहीम वेगाने सुरु असल्याबद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन केले. कोरोनाचे संकटत असले तरी सामान्य माणूस उभा राहीला पाहीजे. त्यांनी सांगितले.