अहमदनगर बातम्या

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 25 ऑक्टोबर 2021 :- श्रीगोंदा न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला पाच वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. सचिन शालन पवार (रा. जामखेड) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, आरोपी पवार याने सन 2020 मध्ये एका अल्पवयीन मुलीला रूममध्ये घेवुन जात तिच्यावर अत्याचार केला होता.

अत्याचाराबाबत कोणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी पिडीत मुलीला दिली होती. याप्रकरणी पवार विरोधात जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक नीलेश कांबळे यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्यावतीने वकील अनिल घोडके यांनी बाजू मांडली.

Ahmednagarlive24 Office