अहमदनगर Live24 टीम, 09 डिसेंबर 2021 :- पत्नीचा छळ करणार्या पतीला जिल्हा व सत्र न्यायालयाने दोषी धरून दोन वर्षे साधी कैद व 10 हजार रूपये दंड, अशी शिक्षा ठोठावली आहे.
संतोष रामनाथ गायकवाड (रा. पिंपळगाव माळवी ता. नगर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश अमित एम. शेटे यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, या घटनेतील फिर्यादी विलास रामदास शिंदे (रा. जेऊर बायजाबाई ता. नगर) यांची बहिण सुनीताचे संतोष गायकवाड सोबत लग्न झाले होते.
संतोष बरोबर सासरी राहत असताना तिचा मुलगी झाली या कारणावरून तसेच माहेराहुन जेसीबी घेण्यासाठी दोन लाख रूपयांची मागणी करून तिचा वेळोवेळी छळ केलेला होता.
सदरच्या छळाला कंटाळुन सुनीता हिने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. त्यानुसार विलास शिंदे यांच्या फिर्यादीवरून मयत सुनीताचा पती संतोष गायकवाड, दीर गोरक्षनाथ रामनाथ गायकवाड,
सासु उल्हासाबाई रामनाथ गायकवाड व नणंद संगीता नामदेव रायकर यांचेविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दरम्यान याप्रकरणी न्यायालयाने संतोष गायकवाड याला शिक्षा ठोठावली आहे.