मायलेकास जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना कोर्टाने सुनावली ‘ही’ शिक्षा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- शेवगाव तालुक्यातील भावीनिमगाव येथे मुलगा व त्याच्या आईवर हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन आरोपींना जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्त मजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

याप्रकरणी शिवाजी गदडू काळे, चंदाबाई शिवाजी काळे व संभाजी शिवाजी काळे यांना शिक्षा झाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, 4 जून 2017 रोजी योगेश काळे व त्यांच्या आई केशरबाई काळे हे त्यांच्या शेतामध्ये बांधावरील गिन्नी गवत कापत होते.

यावेळी आरोपींनी त्यांना बांधावरील गवत कापण्यास विरोध केला. यावादातून आरोपींनी योगेश व त्यांच्या आईला खोर्‍याने व लोखंडी पाईपने मारहाण केली. वाद सुरू असताना योगेश यांचे वडील बबन काळे व सोमनाथ शिरसाठ यांनी पळत येऊन सोडवासोडवी केली.

यानंतर योगेश काळे यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला होता. जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.एल. आणेकर यांनी मंगळवारी या खटल्याचा निकाल दिला.

दंडाच्या रकमेपैकी ७० हजार रुपये जखमींना देण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे. या तीन आरोपींना जिल्हा न्यायालयाने तीन महिने सक्त मजुरी व प्रत्येकी २५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24