अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- निसर्गापुढे कुणाचे काही चालत नाही. निसर्ग स्वतःमधेच एक रहस्य आहे. या निसर्गाला काहीही अश्यक्य नाही असे म्हटले जाते. याचीच प्रचिती एका घटनेने आली आहे.
संगमनेर रोडवर थोरात वस्ती वर राहणार्या प्रगतिशील शेतकरी ज्ञानदेव देवराम थोरात यांच्या गाईने काल तीन वासरांना जन्म दिला.
त्यामुळे या परिसरात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी ही वासरे पाहण्यासाठी याठिकाणी गर्दी केली. ज्ञानदेव थोरात यांनी शेतीला दुग्ध व्यवसायाची जोड देत भरभराट केली
आणि आता लक्ष्मी गाईने तीन वासरांना जन्म दिल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. ही बातमी जोर्वे व परिसरात वार्यासारखी पसरताच अनेक बालगोपाळ व दुग्ध व्यवसायातील जाणकारांनी हे तिळे वासरे पाहण्यास गर्दी केली.
काळा व पांढरा रंग असलेल्या तीनही वासरांकडे पाहताना प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये कुतूहल जाणवत होते. यावेळी ज्ञानदेव थोरात म्हणाले,
आधिक मासाचा हा महिना असून यामध्ये झालेली ही तिळे वासरे ही आनंदाची व पूर्वपुण्याई आहे. त्यांचे आपण चांगले संगोपन करणार असून यांना गंगा, यमुना व सरस्वती हे नाव देण्यात आले आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved