अहमदनगर बातम्या

अशी दुर्देवी घटना घडवण्या इतकी महाराष्ट्राची संस्कृती वाईट नाही !

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 06 नोव्हेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत 10 कोरोना रुग्णांचा होरपळून मृत्यू झालाय. तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. रुग्णालयातील अतिदक्षता विभागात ही आग लागल्यामुळे मोठी खळबळ माजली.

“नगरची घटना दुर्दैवी आहे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून कोणी तरी ती घटना घडवली, असं मी म्हणणार नाही. अशी दुर्देवी घटना घडवण्या इतकी महाराष्ट्राची संस्कृती वाईट नाही.

पण घटना घडल्यानंतर दोन तीन दिवस फक्त चर्चा होते. चौकशी समिती नेमली जाते. त्या चौकशी समितीच्या अहवालाच पुढे काय होतं ? सगळ्यांनी या घटनेत मदत कार्य केलं पाहिजे.

या घटनेचा चौकशी अहवाल लोकांना समजायला हवा,” असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. दरम्यान, अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयातील आग शॉटसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय.

दरम्यान, या दुर्घटनेप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयु वॉर्डातआज आग लागून झालेल्या

दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोकसंवेदना व्यक्त केली असून याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office