बंधारा फुटून शेतात घुसले पाणी…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,19 सप्टेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथे बंधाऱ्याचा भराव फुटून या बंधाऱ्यातील पाणी लगतच्या शेतात जाऊन पिकांचे नुकसान झाले.

आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी करून झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांना दिल्या आहेत.

नुकसानीचे पंचनामे करून मदतीसाठी प्रस्ताव तयार करावे, या बंधाऱ्याची दुरुस्ती करा, अशा सूचना आमदार काळे यांनी केल्या. यावेळी सभापती पौर्णिमा जगधने,

काळे कारखान्याचे संचालक विठ्ठलराव आसने, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, उपअभियंता उत्तम पवार,

भाऊसाहेब देवकर, छगनराव देवकर, धनंजय देवकर, शशिकांत देवकर, गणेश पळसकर, बाबासाहेब जगताप, बाळासाहेब देवकर, गोरख देवकर, यशवंत देवकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24