धरणे भरली; आता सुयोग्य नियोजनाची गरज

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 सप्टेंबर 2020 :- यावर्षी मान्सूनने सर्वदूर हजेरी लावली. सातत्याने पडणाऱ्या या पावसाने जिल्ह्यातील तसेच लगतची सगळीच धरणे जवळपास भरली आहेत. त्यामुळे एक समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे.

परंतु आता या पाण्याच्या योग्य नियोजनाची गरज आसल्याचे मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. या अनुकूल परिस्थितीला एक जबाबदार लाभधारक आणि प्रभावी तसेच कार्यक्षम सिंचन व्यवस्थापन याद्वारे उत्पादन वाढीत रुपांतरीत करु शकतो किंवा कसे, याचेही तटस्थ मुल्यमापन करणे

गरजेचे झाले आहे,असे मत जलसंपदा विभागाचे सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता उत्तमराव निर्मळ यांनी मांडले आहे. मागील वर्षीही जायकवाडीसाठी पाणी सोडले गेले नव्हते आणि नगर नाशिक मधील धरणेही जवळपास शंभर टक्के भरलेली होतीच.

अशी परिस्थिती असतांनाही प्रवरा कालवे वगळता (सध्या निळवंडेचे अतिरिक्त पाणी वापरात आहे) मुळा,पालखेड, गोदावरी कालव्यांवरील सिंचन आवर्तने सर्वार्थान सुलभरित्या पार पडू शकलेली नाही. अगदी शंभर टक्केच्या आसपास पाणी असुनही जेमतेम दोन तीन आवर्तने देताना सुध्दा ओढाताण झाली आहे.

सुदैवाने पाऊस मे जुनच्या दरम्यान लवकर झाल्याने पुढील अनेक गोष्टी टाळल्या गेल्या. या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य नियोजन होणे गरजेचे आहे असे मत अभ्यासकांनी मांडले आहे.

* साधारणतः काय करावे? :- आवर्तन वेळापत्रक तारखेसहित ( रब्बी व उन्हाळ्यासाठी) एकाचवेळी लोकप्रतिनिधींच्या साक्षीने, वेळेत जाहीर होणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या त्या प्रकल्प क्षेत्रात बैठक घेऊन लाभधारकांना विश्वासात घेऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. महत्वाचे म्हणजे घोषित केलेली आवर्तने दिली गेली पाहिजेत.

कारण पिके आश्वासनानंतर जगत नाहीत. अकार्यक्षम व नियोजन शुन्य सिंचन व्यवस्थापन करुन घोषित आवर्तनापेक्षा कमी आवर्तन देऊन, लाभधारकांची फसवणूक तसेच नुकसान झाल्यास, भरपाई देणे भाग पाडण्यासाठी कायदेशीर मार्ग चोखाळला तर प्रशासकीय यंत्रणा सतर्क,

सावध, सजग, कार्यक्षम, जबाबदार होऊ शकेल. लाभधारक आणि प्रशासन या दोघांकडुनही कठोर भूमिका घेऊन परिस्थिती मुळ पदावर आणण्यासाठी प्रामाणिकपणे काम होणे गरजेचे आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24