अहमदनगर बातम्या

धरण भरले मराठवाड्यातील अन आनंद झाला नगर, नाशिकच्या नागरिकांना ; काय आहे नेमका कारण …

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : जोपर्यंत जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरत नाही. तोपर्यंत नगर-नाशिक जिल्ह्यातील नागरीकांची धाकधूक सुरु असते. कारण समन्यायी पाणी वाटपानुसार जायकवाडी धरण जो पर्यंत ६४ टक्के भरत नाही.

तोपर्यंत नगर- नाशिक जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यावर मराठवाड्यातील नागरीकांचा हक्क सांगितला जातो. या कायद्यामुळे नगर-नाशिककरांच्या हक्काचे पाणी डोळ्यांदेखत जायकवाडी धरणात सोडण्याची वेळ येते.

पण आता निसर्गाने चमत्कार करीत जायकवाडी शंभर टक्के भरल्याने नगर नाशिकच्या धरणाच्या पाण्यावर विसंबून असलेल्यांना समाधान झाले आहे.त्यात आता पाणी सोडावे लागणार नसल्याने नगर नाशिकच्या नागरिकांना आनंद झाला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ पाण्यासाठी मराठवाडा विरुद्ध नगर- नाशिक हा वाद संपूर्ण राज्याला परिचित आहे. दरवर्षी पाण्यावरून कोर्ट कचेऱ्यासह अनेक आंदोलने करीत थेट मंत्रालयात आवाज उठवणारे नेते मंडळी देखील शांत झाले आहेत.

मराठवाड्यातील नागरीकांना नगर नाशिकच्या पाण्याची गरजच पडणारा नाही. कारण यावर्षी अजून पावसाळा बाकी असतानाच मराठवाड्याचं जायकवाडी धरण शंभर टक्के भरले आहे. चालुवर्षी पिण्याचा व सिंचनाचा पाणीप्रश्न मिटल्याने पाण्यावरून राजकारण करणाऱ्यांची तोंड पावसानेच बंद केल्याची चर्चा नागरिक करत आहेत.

एकदा जायकवाडी धरण शंभरटक्के भरले तर मराठवाड्यातील नागरीकांचा पुढील चारवर्षा पिण्याच्या पाण्याचा तर दोन वर्षे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे नगर नाशिकच्या धरणातील पाणी जायकवाडीला सोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

चालुवर्षी दमदार पाऊस पडल्याने नगर नाशिक जिल्ह्यातील धरणे तुडुंब भरली आहेत. सर्वदुर पाऊस दमदार झाल्याने सध्यातरी पाण्याची मागणी कमी झाली आहे.

विशेषतः मराठवाड्यात अजूनही जोरदार पाऊस सुरु असल्याने जायकवाडी धरणाबरोबर माजलगावचे धरण सुध्दा काठोकाठ भरत आले आहे. मराठवाड्यातील कोरडी असलेली छोटीमोठी धरणे बऱ्यापैकी जलमय झाल्याने चालु वर्षी कुठेही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही.

 

Ahmednagarlive24 Office