अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :-दरम्यान हा प्रकार नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथे घडला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, प्राजंली बाळासाहेब गव्हाणे (रा. राहुरी फॅक्टरी) चा विवाह वडाळाबहिरोबा येथील संजय मोटे यांचे चिरंजीव महेश बरोबर झाला होता.
प्राजंली बाळासाहेब गव्हाणे (रा. राहुरी फॅक्टरी) चा विवाह वडाळाबहिरोबा येथील संजय मोटे यांचे चिरंजीव महेश बरोबर झाला होता. या दांपत्यास एक मुलगाही झाला.
सारं कुटुंब आनंदात असताना नगर-औरंगाबाद रस्त्यावर अभियंता महेशचे अपघाती निधन झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. अभियंता असलेल्या दीर महेंद्रबरोबर तिचा विवाह निश्चित झाला असून जानेवारीत हा विवाह होणार आहे.
सासरा, दीर व कुटुंबाने मनाचा मोठेपणा दाखवत निर्माण झालेली अवघड स्थिती लक्षात घेवून हे नवे नाते स्विकारले आहे. सासरे संजय मोटे यांनी आता वडिलांची भुमिका स्विकारत विधवा सुनेचे कन्यादान करण्याचा निर्णय घेतला आहे. हा अगळा आदर्श परीसरात कौतुकाचा विषय ठरला आहे.