अहमदनगर Live24 टीम, 13 ऑक्टोबर 2021 :- विमा कंपन्या गब्बर झाल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारला ऐकू येत नाही, महाविकास आघाडी सरकारने कान बंद केले आहेत, असे बहिरे सरकार आमच्या वाट्याला आले.
म्हणून हे जागर एफ आर पी चा अभियान सुरू केले आहे. असे सांगून तुम्ही लढा उभा करा, मी तुमच्या ऊसाला तीन हजार रुपये टन भाव देतो, अशी ग्वाही यावेळी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
जागर एफआरपीचा या अभियानांतर्गत खासदार शेट्टी आज शेवगाव मध्ये आले होते, त्यावेळी ते बोलत होते.यावेळी बोलताना ते म्हणाले कि,
विमा कंपन्या करोडो रुपयांचा नफा मिळवत असून सरकारी कर्मचाऱ्यांची मिलीभगत असल्यामुळे शेतकऱ्यांना विमा मिळत नाही. राज्यातील हे सरकार बहिर झालं आहे.
त्याला शेतकऱ्यांचा आक्रोश ऐकू येत नाही, अशी टीका करून ठाकरे साहेब तुमच्या राज्यात चाललंय काय? असा प्रश्न खासदार राजू शेट्टी यांनी केला. दरम्यान यावेळी रवीकांत तुपकर,
प्रकाश तात्या बालवडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष रावसाहेब लवांडे, जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे, ज्येष्ठ नेते दिलीपराव लांडे पाटील, सुनील लोंढे,
महिला जिल्हाध्यक्ष स्नेहल फुंदे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे, दादा पाचरणे, प्रवीण म्हस्के, दादा टाकळकर आदींसह अनेकजण उपस्थित होते.