अखेर नेवासा तालुक्यातील ‘त्या’ प्राथमिक शिक्षकाचा मृत्यू..!

Ahmednagar News:नेवासा तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षक गुणाजी केरू दगडखैर (वय वर्ष ४८) यांचा काल उपचारादरम्यान दुर्दैवाने मृत्यू झाला. दगडखैर यांना शनिवारी रात्री सर्पदंश झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याबाबत सविस्तर माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावचे सुपुत्र गुणाजी दगडखैर हे शिक्षक नेवासा तालुक्यातील एका जिल्हा परिषदेच्या शाळेवर कार्यरत होते. दरम्यान शनिवारी त्यांना सर्पदंश झाला होता.

त्यानंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी नगरला हलवण्यात आले. प्रथम सरकारी दवाखान्यात व नंतर खाजगी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु दुर्दैवाने मंगळवारी त्यांचे निधन झाले.

Advertisement

दगडखैर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. धार्मिक सामाजिक कार्यात त्यांचा नेहमी सहभाग असायचा त्यांच्या निधनामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.