अहमदनगर Live24 टीम,30 जुलै 2020 :- अकोले शहरात कोरोना साथरोग प्रतिबंध व नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न प्रशासन व नागरिकांकडून सुरू आहे. या काळात अनेकदा लाॅकडाऊन घेण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आले.
घेतलेला लाॅकडाऊन नागरिक व सर्व व्यापाऱ्यांनी आतापर्यंत यशस्वी केला. मात्र हे लाॅकडाऊन आजवर शहरातील प्रमुख व्यापारी व व्यावसायिकांना विश्वासात घेऊन घेतलेले नाहीत.
कोणी तीनचार व्यापारी म्हणजे अकोले शहरातील व्यापारी असोसिएशन होत नाही. त्यामुळेच लाॅकडाऊन किंवा शहर बंदबाबत निर्णय घेण्याची बाब ही ठरावीक कोणाची मक्तेदारी नाही.
शहरातील व्यापारी वर्गातील सर्व घटकांना संघटनेत स्थान देऊन सामावून घ्यावे, अन्यथा भविष्यात असा लाॅकडाऊन किंवा बंद पुकारल्यास तो व्यापाऱ्यावर बंधनकारक राहणार नाही,
असा इशारा अकोल्यातील सारडा उद्योग समूहाचे संचालक विजय सारडा, सोन्या-चादीचे व्यापारी दिलीप शहा, माजी सरपंच, प्राचार्य संपत नाईकवाडी यांनी दिला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com