अहमदनगर बातम्या

मनोहर नाव असतानाही ‘संभाजी’ नाव वापरून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी !

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख मनोहर भिडे यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधान केल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने त्याचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. श्रीगोंदा येथे महामानव विचार संवर्धन समितीच्या वतीने मनोहर भिडे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करत त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडे केली.

तहसीलदार यांना महामानव विचार संवर्धन समितीच्या वतीने दिलेल्या निवेदनात भिडे यांनी महापुरुषांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावर सर्वसामान्य जनतेतून संतापाची तीव्र भावना व्यक्त होत आहेत. ते वारंवार मनुवादी वक्तव्ये करत असून, महात्मा जोतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या बाबत देखील अशीच अक्षेपार्ह वक्तव्ये केली आहेत. आता सुद्धा समाजसुधारक राजा राममोहन रॉय, महात्मा गांधी आणि पंडीत नेहरू, शिर्डीचे साई बाबा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून महापुरुषांचा अपमान करून समाजात तेढ, विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

यामुळे समाजात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. तरुणांची माथी अडकावून दंगली घडवण्याचे षड्यंत्र यातून दिसून येत आहे. इथून पुढे आणखी इतरही लोकांनी अशी केल्यास समाजव्यवस्था धोक्यात येणार असल्याने भिडे यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करत तत्काळ अटक करून, आणखी समाजविघातक वक्तव्ये करण्यापासून रोखावे.

तसेच मनोहर नाव असतानाही ‘संभाजी’ नाव वापरून छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाची बदनामी करत असल्याने हे नाव वापरण्यास मज्जाव करावा. तसेच शिवप्रतिष्ठान’ या त्याच्या संघटनच्या माध्यमातून ३२ मण सोनेरी सिंहासनच्या मावून गोळा केलेल्या बेकायदेशीर देणगीचा तपास करण्यात यावा.

अशी मागणी करत श्रीगोंदा येथील शनीचौक परिसरात तसेच तहसील कार्यालय श्रीगोंदा या ठिकाणी मनोहर भिडे याच्या फोटोला जोडे मार आंदोलन करत त्याचेवर कारवाई करावी असे निवेदन दिले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, ऋषिकेश गायकवाड, सतिष बोरुडे, आदेश शेंडगे, योगेश मेहेत्रे, मुकुंद सोनटक्के, अॅड. सुशील शिंदे यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

Ahmednagarlive24 Office