अहमदनगर Live24 टीम, 27 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यात गुन्हेगारी सुसाट सुटली आहे, कायद्याचे धाक न राहिल्याने अवैध धंदे देखील वाढू लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव शहरात अवैध धंदे तेजीत सुरू आहे.
पोलिस याकडे जाणूनबुजुन दुर्लक्ष करीत असल्याच्या आरोप नागरिकांनी केला आहे. शहरातील मटक्याच्या पेढ्या जोरात सुरू आहे.
याबाबत काही जागरूक नागरिकांनी मटक्याच्या चिठ्ठ्या सोशल मिडीयावर टाकून कारवाईची मागणी केली आहे. मात्र पोलिसांकडून दिखावेगिरी करत अनेकांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.
तेव्हा पोलिस प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे. करोनामुळे अशीच नौकर्या गेल्या आहेत, रोजगार उपलब्ध होत नाही, त्यातच जुगार मटका हे जोरात सुरु असल्याने अनेक संसार उध्वस्त होत आहे.
अनेकवेळा हेच लोक गुन्हगारीकडे वळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र पोलिस प्रशासन मटका बुकींच्या सेवेत तैनात असल्यामुळे त्यांना सर्वसामान्य जनतेची ही दुरावस्था दिसत नाही, असा आरोप थेट सोशल मिडीयातून होत असून शहरातील या मटका बुकींवर पोलिसांनी धडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.