अहमदनगर बातम्या

भर रस्त्यात झाले महिलेचे बाळंतपण .. आरोग्य व्यवस्थेचा सर्व स्तरातून निषेध

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :-   राहुरी फॅक्टरी येथील ३० वर्षीय महिला बाळांतपणाच्या त्रासाने विव्हळत होती. गुरुवारी सकाळी ६ वाजता बाळंतपणासाठी रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली असता देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी त्या महिलेस हकलावून लावले.

प्राथमिक आरोग्य केंद्रापासून अवघ्या 300 फूट अंतरावर या महिलेचे बाळंतपण रस्त्यावर झाले. बाळंतपणासाठी आलेल्या महिलेची हेळसांड करण्याऱ्या वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ व परिचारिका यांचे त्वरित निलंबन करण्याची मागणी आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली आहे.

देवळाली प्रवरा प्राथमिक आरोग्य केंद्राबाबत सातत्याने तक्रारी होत असताना गुरुवारी सकाळी ६ वाजता राहुरी फॅक्टरी येथील कोमल अरुण शिंदे ही महिला बाळंतपणासाठी आलेली असताना तिला हाकलून लावले. या तक्रारीची आणखी भर पडली आहे.

तिला हाकलून लावल्यानंतर अवघ्या 300 फुटावर नगरपालिका कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस पोलीस मैदानाजवळील रस्त्यावर महिलेची नैर्सगिक प्रसूती झाली.

त्यावेळी आजूबाजूच्या महिला मदतीसाठी धावल्या. या महिलेस नगरपालिकेच्या भिंतीजवळ नेऊन साड्यांचा आडोसा तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारिकेस बोलावून घेऊन नवजात बालकाची नाळ कापण्यात आली.

त्यानंतर सदर परिचारिकेच्या झालेली चूक लक्षात आल्याने परिचारिका व संबंधित महिलांनी तिला आरोग्य केंद्रात पोहोच केले.

प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी तिच्या बाळंतपणाची तारीख १५ फेब्रुवारी २०२२ असल्याचे रिपोर्टमध्ये दाखविले असल्याचे असल्याने तिच्या बाळंतपणास एक महिना कालावधी असल्याने तिला घरी जाण्यास सांगितले होते.

ज्यावेळी ती प्राथमिक केंद्रात आली त्यावेळी तिला कोणत्या प्रकारच्या वेदना होत नसल्याचे प्राथमिक केंद्रातील परिचारिकेने सांगितले परन्तु कोमलचे पती अरुण शिंदे यांनी तिला पोटात वेदना होत आहे.

माझी मोठ्या दवाखान्यात नायची परिस्थिती नाही. तिला येथेच बाळंतपणासाठी दाखल करून घ्यावे अशी विनवणी केली. परन्तु कामावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांनी अरुण शिंदे यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून त्या महिलेस हाकलून लावले.

अवघ्या ३०० फुटावर जाऊन बाळंत झाली. तिला गोंडस मुलगी झाली. बाळ व बाळाची आईची प्रकृती चांगली आहे. मात्र बाळंतपणसाठी आलेल्या

महिलेला हाकलून लावल्याबद्दल देवळालीतील विविध संघटना व आरपीआय जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात येथील वैद्यकीय अधिकारी अण्णासाहेब मासाळ व परिचारिका यांना निलंबित न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office