अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात लसीकरण मोहीम अत्यंत प्रभावीपणे राबवण्यात आली. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव देखील जिल्ह्यात कमी होत गेला. जिल्ह्यात दररोज १५ हजार लोकांच्या कोवीड चाचण्या होत आहेत.
दरम्यान यातच आज घडीला जिल्ह्यात लसीचे १ लाख १७ हजार डोस शिल्लक आहेत. वारंवार – जनजागृती तसेच आवाहन करूनही करोना प्रतिबंधक लसघेण्यासाठी नागरिक पाठ फिरवत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.
यासंदर्भात खुद्द पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यात लसीकरण मोहीम व्यापकपणे राबविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले कि, देशात १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला गेला आहे. नगर जिल्ह्यातही ३२ लाख ५६ हजार डोसचे लसीकरण झाले आहे.
यात दुसरा डोस ८ लाख ४४ हजार लोकांनीच घेतला आहे. दुसरा डोस घेणारे लोकांची संख्या वाढली पाहिजे यासाठी गावपातळीवरील शासकीय सेवक,
सरपंच व लोकप्रतिनिधींनी लोकांमध्ये जाऊन त्यांना कोवीड लसीकरणासाठी प्रवृत्त करावे. लोकांचे समुपदेशन करावे. अशा सूचना करून त्यांनी शासन राबवित असलेल्या मिशन कवच कुंडले व युवा स्वास्थ्य मोहीमेविषयी माहिती दिली.