अहमदनगर Live24 टीम, 24 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक वषांपासून प्रलंबित असलेला व नगरकरांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेला नगर शहरातील उड्डाणपुलाबाबत एक महत्वाची माहिती समोर आली आहे. उड्डाण पुलाच्या प्रारंभिक कामासाठी आता हळूहळू सुरुवात होऊ लागली आहे.
उड्डाणपुलाच्या कामासाठी पूर्वतयारी म्हणून बांधकाम होणार्या जागेला पत्र्याच्या भिंती टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशोका हॉटेलपासून या कामास सुरूवात झाली आहे.
सक्कर चौकापर्यंत हे काम होणार आहे. शहराच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार्या बहुचर्चित उड्डाणपुलाच्या प्रत्यक्ष कामास यामुळे सुरूवात झाल्याचे मानले जाते.
जमिनी खाली कोणत्या प्रकारचा खडक आहे, किती मुरूम आहे हे ड्रिल करून मागील महिन्यात तपासणी करण्यात आली. सुमारे 100 खांब पुलासाठी उभारण्यात येणार आहेत.
त्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी बांधकाम सुरू असलेल्या भागाभोवती पत्रे ठोकण्यात येणार आहेत. अशोका हॉटेल ते जीपीओ चौक दरम्यान हे पत्रे लावण्याचे काम सुरू करण्यात आले. दरम्यान, पत्रे ठोकण्याचे काम हाती घेण्यात आल्यानंतर या मार्गावर वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.