अहमदनगर Live24 टीम, 6 नोव्हेंबर 2020 :- दारूचा घोट घशाखाली गेला कि माणसाला चांगले वाईट यामधील फरक दिसेनासा होतो. दारूच्या नशेत अनेकदा आपल्या हातून चुकीच्या घटना घडतात. असाच काहीसा प्रकार एका दारुड्याच्या बाबतीत झाला आहे.
चक्क एका रुग्णालयातील दारुड्याने रात्रीच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये गोंधळ घालत प्रशासनाची डोकेदुखी वाढवली. हा प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की, हा कर्मचारी रात्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक याच्या खोलीवर आला व माझा ऑक्टोबरचा पगार का काढला नाही असा जाब वैद्यकीय अधीक्षकांना विचारू लागला व त्यांचेशी हुज्जत घालू लागला.
त्यांचा वाद पाहता एका कर्मचाऱ्याने मध्यस्ती केली मात्र या दारुड्याने समजूत घालणाऱ्या कर्मचाऱ्यासोबत धिंगाणा सुरू केला. दरम्यान इतरांनी मध्यस्ती करून त्याला शांत केले.
आज शुक्रवारी वैद्यकीय अधीक्षक यांनी त्या कर्मचाऱ्याला शिस्तभंगाची कारणे दाखवा नोटीस बजावली असून ५ दिवसात खुलासा मागितला आहे
दरम्यान दारूच्या नशेत वैद्यकीय अधिकाऱ्या बरोबर पगारावरून वाद घालणारा कर्मचारी हा अस्थाई कर्मचारी असुन तो शिपाई पदावर काम करतो. श्रीरामपूर येथून त्याची शिक्षेवर कोतुळ येथे बदली झाली असून गेल्या दोन वर्षांपासून कोतुळ ग्रामीण रुग्णालयात सेवेत आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved