अहमदनगर बातम्या

दारूच्या नशेत तर्राट झालेल्या दुचाकीस्वाराने दुसऱ्या दुचाकीस्वाराला मागून दिली धडक

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2021 :- मद्यपी तरूणाने सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत रस्त्याच्या कडेने जाणार्‍या दुसर्‍या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली व त्यानंतर अपघात झालेल्या व्यक्तीस मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला.

याबाबत अधिक माहिती अशी कि, साकुरी-शिर्डी रस्त्यावर साईदत्त ट्रेडर्स समोर हा अपघात घडला आहे. यात एक मद्यपी तरूण सुसाट वेगाने मोटारसायकल चालवत असून काही अंतर पुढे गेल्यानंतर एका मोटारसायकला पाठीमागून जोराची धडक देताना दिसत आहे.

मोटारसायकलवर शेतमाल घेऊन जाणार्‍या शेतकर्‍यास मद्यपी तरूणाने जोराची धडक दिली. शेतकरी मोटार सायकलवरून खाली पडला तर मोटारसायकल रस्त्याच्या कडेला पडली होती.

या अपघातानंतर मद्यपी बाईकस्वाराने तेथून पळ काढला. अपघाताचा हा प्रसंग पाठीमागे असलेल्या एकाने मोबाइल कॅमेर्‍यात कैद केला आणि तो सोशल मिडीयावर व्हायरल केला.

गेल्या तिन दिवसांपासून मोटारसायकल अपघाताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. या अपघातानंतर पोलिस ठाण्यात अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office