अहमदनगर बातम्या

रस्त्यावरील धुळीने घेतला महिलेचा बळी…? ‘या’ ठिकाणी घडली ही घटना..!

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News: रस्त्यावर असलेल्या खड्यामुळे अनेकदा अपघात होतात. मात्र आता रस्त्यावरील उडणाऱ्या धुळीमुळे देखील अपघात होऊन यात एका महिलेचा बळी गेला असून अन्य पाचजण जखमी झाले आहेत.

या अपघातात गोदावरी पांचाळ (रा.लातूर) ही महिला ठार झाली असून इतर पाच जण जखमीवर दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत अधिक माहिती अशी ,लातूर जिल्ह्यातील सहाजण पुण्याच्या दिशेने क्रूझर (एम.एच-२५ आर-२०४५ ) या गाडीतून जात होते .

श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव शिवारातील वितरिका क्रमांक तेरा जवळ हे वाहन आले असता, समोरून एक ट्रक गेला. त्याच दरम्यान रस्त्यावर उडालेल्या धुळीमुळे क्रूझर गाडीच्या वाहनचालकास समोरचे काहीच दिसेनासे झाले त्याच दरम्यान ही गाडी वितरिकेत जाऊन आदळली.

वाहनाचा वेग जास्त असल्याने गाडीतील गोदावरी पांचाळ या महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दिगंबर पांचाळ, अश्विनी पांचाळ, मंगल सुतार व अन्य दोन प्रवाशी (रा.पोहेरेगाव ता. रेणापूर जि.लातूर) हे जखमी झाले.

गाडी वितरिकेत पडल्यानंतर मोठा आवाज झाल्याने आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना गाडीतून बाहेर काढत उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यातील तिघांना जबर मार लागल्याने दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office