अहमदनगर Live24 टीम, 23 ऑक्टोबर 2021 :- नगर जिल्ह्यातील ५४ सहकारी सोसायटीच्या निवडणुकीसाठी १३ सप्टेंबर २०२१ रोजीच्या आदेशान्वये दि. ३१ ऑगस्ट २०२१ रोजीच्या दिनांकापासून तयार केलेल्या
मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी दिली.
कसा असणार आहे निवडणूक कार्यक्रम ? जाणून घ्या सविस्तर
२२ ऑक्टोबर २०२१ रोजी स. ११ वाजता प्रारूप मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
यावर २२ ऑक्टोबर २०२१ ते १ नोव्हेंबर २०२१ सकाळी ११ ते दु. ३ वाजेपर्यंत प्रारूप मतदार यादीवर हरकती स्विकारल्या जातील.
११ नोव्हेंबर २०२१ दु.४ वाजता आलेल्या हरकतींवर निर्णय घेतले जाणार आहेत.
१६ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली जाणार आहे.
या सर्व निवडणूक मतदार यादी कार्यक्रमाची प्रक्रिया जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर व संबंधित उप / सहाय्यक निबंधक सहकारी संस्था व संस्थेच्या कार्यालयात होणार आहेत.