संतप्त ग्रामस्थ मृतदेह घेऊन थेट सरकारी कार्यालयात पोहचले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 डिसेंबर 2020 :- नगर तालुक्यातील खडकी येथील वीज कंपनीच्या कंत्राटी कामगाराचा बाबुर्डी बेंद येथे काम करत असताना शॉक लागून मुत्यू झाला. गुरूवारी सकाळी ही घटना घडली.

रुपेश सुकदेव बहिरट असे मयत कर्मचार्‍याचे नाव आहे. या कंत्राटी कामगाराच्या कुटुंबियांना 50 लाख रुपयांची मदत मिळावी, कर्मचार्‍यांच्या सुरक्षिततेबाबत हलगर्जीपणा करणार्‍या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाई करावी,

अशी मागणी करत नातेवाईक व ग्रामस्थांनी मृतदेह थेट नगरमध्ये वीज कार्यालयासमोर ठेऊन ठिय्या आंदोलन केले. वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेतले.

यावेळी माजी सभापती बाळासाहेब हराळ, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, बाजार समिती सभापती अभिलाष घिगे, आदी उपस्थित होते.

तणावाचे वातावरण असल्याने यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वीज वितरणचे अधीक्षक अभियंता यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेत रूपेश याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24